Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

शेतकऱ्यांच्या धान साठवणुकीच्या समस्येला दिलासा

 बामणी सोसायटीचे उद्घाटन; शेतकऱ्यांच्या धान साठवणुकीच्या समस्येला दिलासा

सिरोंचा 11 जून 

                       तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने पुढाकार घेणारे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनय्या जनगाम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, शहराध्यक्ष रवी सुलतान, सोसायटी अध्यक्ष चिन्ना पेंटा रामन्ना तलांडी, सचिव रामाराव बांदारी, दुर्गम बापू, दुर्गम शंकर, रमेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बामणी सोसायटीचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

रब्बी हंगामातील धान खरेदीनंतर हजारो क्विंटल धान साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक शेतकरी धान कुठे ठेवायचे, तसेच पावसापासून धानाचे संरक्षण कसे करायचे, या चिंतेत होते. ही बाब लक्षात घेऊन बामणी सोसायटीच्या माध्यमातून धान साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि धान सुरक्षित ठेवण्यासाठी अशा सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बामणी सोसायटीच्या उद्घाटनामुळे धान साठवणुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, परिसरातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments