Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

45 डिग्री तापमाना मध्ये त्रस्त नागरिकांचे आंदोलन

 

अखेर 30 गावांतील नागरिकांचा संताप; सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात

📍 सिरोंचा  24 में 

    प्रतिनिधि

         टेकडाताल्ला–कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावर सुरू असलेले पुलाचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत रखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाकडून वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर संतप्त नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाचा तंबू ठोकत आंदोलनाला सुरुवात केली आहे.

या आंदोलनात टेकडाताल्ला, कंबालपेठा तसेच परिसरातील तब्बल 30 गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अट्टीवागू नाल्यावर पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची वाहतूक तसेच रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेण्यात मोठ्या अडचणी येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

“तात्काळ पुलाचे काम सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments