Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

एका परिवाराने बाबा वरील अटूट विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला

 बंगाली मतूआ धर्मीय समाजातील मनोज बार व सुमित्रा बार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

अहेरी 23 में 

प्रतिनिधि 

          आलापल्ली येथे बंगाली मतूआ धर्मीय समाजातील सदस्य श्री. मनोज बार आणि सौ. सुमित्रा बार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.

आजच्या स्वार्थी आणि बदलत्या राजकारणात माणुसकी जपणारे नेते फार कमी दिसतात. पण बाबा यांनी आपल्या साधेपणा, जनतेशी असलेली नाळ आणि संघर्षशील वृत्तीमुळे लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक अध्याय एक संदेश देतो "जीवनात कितीही मोठे संकट आले तरी खचायचे नसते; संघर्षातून नवीन मार्ग निर्माण करून पुन्हा उभे राहायचे असते.”

म्हणूनच समाजात “बाबा” हे नाव केवळ एका राजकारण्याचे नाही, तर जनतेच्या विश्वासाचे, संघर्षाचे आणि प्रेरणेचे प्रतीक बनले आहे. अशा जन नेत्याला मनाचा मुजरा !

वरील प्रसंगी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत समाजाच्या विकासासाठी पक्षासोबत कार्य करण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या प्रवेशामुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments