Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

वैशाली मेकओव्हर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीचा तृतीय बॅच प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 वैशाली मेकओव्हर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीचा तृतीय बॅच प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सिरोंचा | प्रतिनिधी :



वैशाली मेकओव्हर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीच्या तृतीय बॅचमधील विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अकॅडमीतून मेकअप व ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीच्या संचालिका वैशाली मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार, श्रीजा भंडारी (शिक्षिका) तसेच स्वाती बर्डे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत, ब्युटी व मेकअप क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अशा प्रशिक्षण संस्थांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

अकॅडमीच्या संचालिका वैशाली मॅडम यांनी प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

"कौशल्यातून स्वावलंबनाकडे" हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

Post a Comment

0 Comments