Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

वाढदिवसाला सामाजिक सेवेची अनोखी भेट

 वाढदिवसाला सामाजिक सेवेची अनोखी भेट

मित्रांच्या पुढाकारातून वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य व अन्नधान्य वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सिरोंचा (प्रतिनिधी) : 

                श्याम मादेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापणे, मेजवानी देणे किंवा पार्टी करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत मित्रांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद हायस्कूल, सिरोंचा येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामुळे वाढदिवसाला एक वेगळी आणि प्रेरणादायी दिशा मिळाली.

यावेळी विद्यार्थ्यांना 1,000 चॉकलेट, 50 पुस्तके आणि 1,000 पेन यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गरजू कुटुंबांना राशन किटचे वाटप करून सामाजिक सेवेचा आदर्शही समाजासमोर ठेवण्यात आला.

                   या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेचा सुंदर संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. उपस्थितांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल, अनुप, वेणू, राधेश्याम, संपत, नागराजू, चिन्नान्ना, राजू आणि अभिषेक यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्तीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments