Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

राजे डॉ धर्मराव बाबा आत्राम माजी केबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार यांची बैठक सम्पन्न

सिरोंचा परिसरातील विकासकामांना ९० कोटींची मोठी सौगात

सिरोंचा 04 में 2026

अमितकुमार तिपट्टी

                  सिरोंचा परिसरातील विकासकामांना ९० कोटींची मोठी सौगात; आढावा बैठकीत अतिक्रमण धारकांसाठी १५०० चौ.फुट जागेचा प्रस्ताव

सिरोंचा परिसराच्या विकासाला नवी दिशा देत सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून नगर व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना बळकटी देत विविध विकासकामांना गती मिळत आहे.

मातोश्री पांदन रस्ते योजनेअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून ग्रामीण भागातील रस्ते संपर्क सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच नगरपंचायत क्षेत्रासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून नागरिकांना फिल्टरयुक्त शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

याशिवाय जिल्हा विकास योजनेतून सुमारे २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

दरम्यान, आढावा बैठकीत अतिक्रमण धारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत पात्र अतिक्रमण धारकांना १५०० चौ.फुट जागा देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. तसेच कायमपट्टे देण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या सर्व निर्णयांमुळे सिरोंचा परिसरात विकासकामांना गती मिळण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments