Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

पोलीस स्टेशन पातागुडमचा सामाजिक उपक्रम

 पोलीस स्टेशन पातागुडमचा सामाजिक उपक्रम :

 मौजा रायगुडम येथील पिण्याच्या पाण्याच्या विहारीसाठी नवीन मोटार भेट

सिरोंचा. २२ मे  2026

प्रतिनिधी

               पोलीस स्टेशन पातागुडम यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मौजा रायगुडम येथील ग्रामस्थांना गावा मध्ये पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नवीन पाण्याची मोटार स्वखर्चाने उपलब्ध करून देण्यात आली

               गावातील विहारामध्ये वापरली जाणारी जुनी मोटार बंद पडल्यामुळे ग्रामस्थांना पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस स्टेशन पातागुडम येथील अधिकारी व अंमलदार यांनी पुढाकार घेत स्वतःच्या स्वखर्चातून नवीन मोटार उपलब्ध करून दिली. यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले.

             या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ झाली असून “जनतेसाठी पोलीस” ही भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग सदैव तत्पर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर उपक्रमात पोलीस स्टेशन पातागुडम येथील प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर धोत्रे PSI पीएसआय मंगेश कोठावळे, PSI स्वाति बाष्टेवाड व पोलिस अंमलदार मनोज नैताम, सुधीर पोकला, शुभम वैद्य व इतर अंमलदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या कार्याचे कौतुक करून पोलीस विभागाबद्दल समाधान व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments