रंगय्यापल्ली, २७ एप्रिल
👉 अमितकुमार
ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या विकासाचे आणि प्रशासकीय कामाचे मुख्य केंद्र मानले जाते. मात्र, रंगय्यापल्ली ग्रामपंचायत कार्यालयाची दारे अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध ३ फुटला आहे. सोमवारी २) सकाळी अकरा वाजले असतानाही २० कार्यालयाचा एकही कर्मचारी ५) उपस्थित नव्हता. महत्त्वाच्या कामांसाठी आलेल्या गावकऱ्यांना कार्यालयाबाहेरच ताटकळत उभे राहून रिकाम्या हाताने परतावे लागले.
ग्रामपंचायतीचा कारभार
सध्या पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा गावकऱ्यांना प्रशासकीय मदतीची गरज असते, तेव्हा कार्यालयाचा दरवाजा बंद असणे, दुर्दैवी बाब आहे. आज सकाळी कामकाजाची वेळ सुरू होऊनही कार्यालय उघडले नव्हते. कार्यालयाकडे धाव घेणाऱ्या नागरिकांना कर्मचारी दिसले नाही. नागरिक हतबल होऊन
कर्मचाऱ्यांना फोन लावत आहेत; मात्र कर्मचारी फोन उचलण्याचे साधे सौजन्यही दाखवत नाहीत. अनेक प्रयत्नांनंतर एखादा कर्मचाऱ्याने फोन उचललाच, तर तो थेट 'उद्या या, 'परवा या,' अशी उडवाउडवीची उत्तरे देतो.
हा अनुभव गावकऱ्यांना नवीन नाही. ग्रामपंचायत कार्यालय अनेकदा बंद अवस्थेत आढळत असल्याने, शासकीय कामासाठी चक्कर मारून गावकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. ग्रामपंचायत जनतेच्या हितासाठी आहे की केवळ
नावापुरती, असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासकीय शिस्त आणि कामाची जबाबदारी या गोष्टी रंगय्यापल्लीच्या ग्रामपंचायतीत जणू हरवल्या आहेत. या प्रकाराची दखल प्रशासनाने तातडीने घेणे गरजेचे आहे. संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी आणि ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील, याची खात्री करावी, हीच नागरिकांची प्रशासनाकडे रास्त अपेक्षा आहे.
▲

Post a Comment
0 Comments