समाजसेवेने साजरा झाला युवा नेते ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस
सिरोंचा प्रतिनिधी
युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा संदेश देणारे विविध सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण तसेच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून करण्यात आली. यावेळी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यानंतर नागरिक व वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी, "वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी आहे," असे मत व्यक्त केले.
या उपक्रमात नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, विजय रंगुवार, सिद्दिक अली, सुरेश कंबागोनी, एम. डी. शानू, सलाम सातार, समीर आरिगेला, इस्माईल शेख (दादाभाई), मयूर पुपलवार, संदीप गागापुरवार, विजय तोटा, सादिक भाई, संदीप घंटावर, सुजल कमलवार, राजेश बद्दी (चांटी सर), साईकुमार घंटावर, सलमान शेख, स्वप्नील तोकाला, देवया येनगंदुला तसेच ऋतुराज हलगेकर मित्र परिवार, समस्त कार्यकर्ते, मित्रमंडळ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments