Type Here to Get Search Results !

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

ग्राउंड रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज़

खाकीची खरी ओळख; आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबासाठी पातागुडम पोलीस ठरले आधारवड

 खाकीची खरी ओळख; आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबासाठी पातागुडम पोलीस ठरले आधारवड

सिरोंचा : 20 में

प्रतिनिधी अमितकुमार

         पोलिस म्हणजे केवळ कायद्याचे रक्षक नव्हेत, तर संकटात धावून येणारे माणुसकीचे आधारवडही असतात, याचा प्रत्यय पातागुडम पोलिसांनी पुन्हा एकदा दिला आहे.

             सिरोंचा तालुक्यातील पोलीस स्टेशन पातागुडम अंतर्गत येणाऱ्या कोर्ला गावातील रहिवासी लक्ष्मी तोगरी यांच्या घराला दिनांक १३ मे रोजी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले होते. या भीषण आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे व इतर वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन पातागुडमचे प्रभारी अधिकारी श्री. धोत्रे सर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोठवळे सर, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती बस्टेवाड तसेच पोलीस स्टेशनमधील सर्व अंमलदारांनी पुढाकार घेत आगपीडित कुटुंबाला मदतीचा हात दिला. पोलिसांनी संसारोपयोगी साहित्य तसेच आर्थिक मदत देऊन संकटग्रस्त कुटुंबाला धीर दिला.

खाकी वर्दीतील ही माणुसकी पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. “आगीत संसार जळाला, पण माणुसकीची ऊब कायम राहिली,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. पातागुडम पोलिसांनी दाखवून दिलेली सामाजिक बांधिलकी आज परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Post a Comment

0 Comments